संस्थेचे उद्देश्य आणि रचना
शिवशरणार्थ,
पिंपरी-चिंचवड शहर जंगम समाज संस्था हि पिंपरी-चिंचवडच्या जंगम समाज बंधू आणि भगिनींनी मिळून चालू केलेली एक सामाजिक संस्था आहे. आपल्या संस्थेचा मूळ उद्देश हा समाज बांधवांना एकत्र आणून अनेक विविध समाज-उपयोगी आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबवणे, सामाजिक बांधिलकी तयार करणे असा आहे.
आपल्या पिंपरी-चिंचवड शहरामध्ये महाराष्ट्र राजातल्या अनेक जिल्ह्यातून जंगम समाज हा एकत्र झालेला आहे. आज पर्यंत, ह्या विखुरलेल्या समाजाला एकत्र आणण्यासाठी असे एक सामायिक व्यासपीठ नव्हते. ह्या माध्यमातून आपल्या सर्व समाजाला एकमेकांची ओळख आणि इतर अनेक कारणांसाठी आपल्या संस्थेचा उपयोग होणार आहे आणि होत आहे.
सुरवातीच्या काळात स्वयंप्रेरणेतून चालू झालेली संस्था आजमितीला एक महाराष्ट्र सरकार मान्यताप्राप्त सहकारी संस्था आहे. आपण संस्थेच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम राबवत असतो त्या सर्व कार्यक्रमांच्या आर्थिक बाबींचे नियोजन हे सहकारी कायद्याच्या नियमानुसार होते.
आपण सर्व समाज बांधवांनी पुढे येऊन आपल्या संस्थेच्या आणि समाजाच्या सर्वांगीण वाढीसाठी पुढे येऊन सहकार्य करावी हि कळकळीची आणि नम्र विनंती. आपण सर्वजण ह्या कामी मदत कराल हि अपेक्षा.
आपला कृपाभिलाषी,
विजय जंगम.
अध्यक्ष - पिंपरी-चिंचवड शहर जंगम समाज संस्था.
(रजि. नं. महाराष्ट्र ६४०/२०११/एफ-३४२८९/पुणे, दिनांक ८/४/२०११)