1 minute read

शिवशरणार्थ,

चिंचवड येथे अजादी का अमृत महोत्सव अंतर्गत महिलांना विविध सरकारी योजना, डिजिटल व आर्थिक साक्षर करून महिला सक्षमीकरण कार्यक्रम संपन्न

दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा व विकास बोर्ड, (श्रम व रोजगार मंत्रालय, भारत सरकार) प्रादेशिक संचालनालय - पुणे व पिंपरी चिंचवड शहर जंगम समाज संस्था महिला आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 28 जुलै 2023 रोजी कै. आनंदीबाई डोके सांस्कृतिक सभागृह, चिंचवड येथे एक दिवसीय डिजिटल व फायनान्शियल लिटरसी (STTP) कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

सदर कार्यक्रमाचे उद्घाटन मा. अजय चारठणकर, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महानगपालिका यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरसेवक मा. अश्विनी चिंचवडे व मा.राजेंद्र गावडे यांच्या हस्ते दिप्रज्वलनाने झाले.

सदर कार्यक्रमात दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा व विकासासाठी बोर्ड, पुणे विभागाच्या शिक्षणाधिकारी श्रीमती सारिका डफरे यांनी महिला सबलीकरण म्हणजे काय आणि त्यासाठी उपयुक्त अशा सरकारच्या योजनांची अतिशय सखोल माहिती दिली. तसेच सध्याचा युगातील डिजिटल व आर्थिक साक्षरते चे महत्व, उपयोगिता, तसेच ऑनलाईन फ्रॉड होऊ नये म्हणुन कोणती काळजी घ्यावी या विषयावर श्रीमती सुप्रिया राठी यांनी माहिती दिली. श्रीमती अस्मिता गडचे यांनी महिलांचे आरोग्य व महिला सबलीकरण या विषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी घरेलू कामगार महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती वर्षा बागले, अनिता मठपती, संध्या स्वामी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचा समारोप महिला आघाडी अध्यक्षा सौ संध्या महेश स्वामी, यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सौ राणी स्वामी, सौ मनीषा जंगम व महिला आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Snow
मा. अजय चारठणकर, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महानगपालिका महिला वर्गाला मार्गदर्शन करताना.
Snow
श्रीमती अस्मिता गडचे महिला वर्गाला मार्गदर्शन करताना.
Snow
डिजिटल व आर्थिक साक्षर शिबिरात आलेले प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक - १.
Snow
>डिजिटल व आर्थिक साक्षर शिबिरात आलेले प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक - २.
Snow
डिजिटल व आर्थिक साक्षर दाखल झालेला महिला वर्ग - १.
Snow
डिजिटल व आर्थिक साक्षर दाखल झालेला महिला वर्ग - २.