less than 1 minute read

शिवशरणार्थ,

सोमवार दिनांक २४ जुलै २०१३ रोजी पिंपरी-चिंचवड शहरातील जंगम समाजाचा अधिक श्रावण मासाचे औचित्य साधून श्री. महादेव रुद्राभिषेक कार्यक्रम सोहळा पार पडला. या प्रसंगी सर्व समाज बांधव उपस्थित होते.

या प्रसंगी समाजातील पौराहित्य करणाऱ्या महेश्वरमूर्तींचा (स्वामींचा) सत्कार समारंभ पार पडला. आपल्या समाजाचा सांस्कृतिक वारसा जपत पौराहित्य परंपरा जतन करण्याबद्दल सर्व स्वामींचे समाज संस्था शतशः आभारी आहे.

येणाऱ्या काळात अनेक होतकरू आणि इच्छुक विद्यार्थीगण हे पौऱ्याहित्य शास्त्र शिकून पारंगत होतील अशी आपल्या सर्वांना अशा आहे. या कामी आपल्याला सर्व स्वामी मंडळींचे मार्गदर्शन वेळोवेळी लाभणार आहे.

Snow
संस्थेचे अध्यक्ष्य श्री. विजय जंगम श्री. राजेंद्र जंगम स्वामींचा सत्कार करताना.
Snow
श्री. जगदीश जंगम श्री. सूर्यकांत कुरुलकर आणि सिद्धेश्वर मठपती स्वामींचा सत्कार करताना.
Snow
श्री. अनिकेत जंगम श्री. महादेव स्वामींचा सत्कार करताना.
Snow
सौ. संध्याताई स्वामी श्री. अमोल स्वामींचा सत्कार करताना.
Snow
श्री. संदीप जंगम श्री. मन्मथ स्वामींचा सत्कार करताना.
Snow
श्री. बसय्या हत्तूरमठ श्री. प्रदीप स्वामींचा सत्कार करताना.
Snow
संस्थेचे अध्यक्ष श्री. विजय जंगम सपत्नीक शंभो-महादेवाचा रुद्राभिषेक करताना.