कार्यक्रम सोहळा - स्नेहमेळा जानेवारी २०२३
शिवशरणार्थ,
सर्व समाज बांधवांना व भगिनींना कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की सालाबादप्रमाणे याही वर्षी संस्थेचा स्नेहमेळावा व हळदी-कुंकू समारंभ, विद्यार्थी गुणगौरव, आणि जेष्ठ नागरिक सत्कार समारंभ प. ब्र. १०८ श्री. गुरुसिद्ध मणिकंठ शिवाचार्य दहिवडकर महाराज यांच्या दिव्या सानिध्यात आनंदात पार पडला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. मु. धानेश स्वामी, IES अधिकारी, भारतीय संरक्षण मंत्रालय आणि मा. मु. श्रवण जंगम, प्रसिद्ध उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते ह्यांचे मार्गदर्शन आपल्या सर्वांना लाभले त्याबद्दल आपली संस्था आणि कार्यकारिणी आपल्या दोघांचे शतशः आभार मानते आणि भविष्यातही आपले मार्गदर्शन आम्हा सर्वांना असेच लाभेल अशी कामना करते.
ह्या प्रसंगी पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व जंगम समाज बंधू आणि भगिनींचे सहकार्य आणि उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढविली त्याबद्दल संस्था आणि कार्यकारिणी आपल्या सर्वांचे अभिनंदन आणि आभार प्रकट करते.
ह्या कार्यक्रम निमित्त आपल्या संस्थेच्या वतीने आपण वरील नमूद केलेले कार्यक्रम पार पडले त्याची छायाचित्रे खाली जोडलेली आहेत, त्याचा आपण सर्वांनी आस्वाद घ्यावा हि विनंती. तसेच, आपण सर्वांनी हा कार्यक्रम सर्व समाज बंधू आणि भगिणींपर्यंत पोहोचवावा हि नम्र विनंती.