less than 1 minute read

शिवशरणार्थ,

सर्व समाज बांधवांना व भगिनींना कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की संस्थेचा राज्यस्तरीय ८ वा जंगम वधू-वर कौटुंबिक परिचय मेळावा सोमवार दिनांक २६/०३/२०२३ रोजी संपन्न झाला. या प्रसंगी महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातून जंगम समाज आपापल्या उपवर वर-वधू मुलांना सोबत घेऊन मेळाव्यात दाखल झाले होते.

अनेक पालकांच्या तसेच मुला-मुलींच्या ओळखीतून एकमेकां बद्दल प्रत्यक्ष माहिती जाणून घेत सर्व पालक समाधानी दिसत होते. ह्याद्वारे, आपण सामाजातील गरजू आणि होतकरू कुटुंबांना मदत करू शकलो ह्याचे संस्थेच्या वधू-वर मंडळाचे मुख्य आणि सर्व स्वयंसेवक मंडळींना खुप आनंद वाटला.

पिंपरी-चिंचवड जंगम समाज संस्था सर्व वर-वधू मंडळींना त्यांच्या भावी सफल वैवाहिक आयुष्यासाठी अनेक शुभेछया आणि आशीर्वाद देत आहे.

Snow
वधू-वर मेळाव्यात दाखल झालेले पालक-वृंद - १.
Snow
वधू-वर मेळाव्यात दाखल झालेले पालक-वृंद - २.
Snow
मेळाव्यात दाखल झालेले इच्छुक वधू-वर मंडळी आपला परिचय देताना - १.
Snow
मेळाव्यात दाखल झालेले इच्छुक वधू-वर मंडळी आपला परिचय देताना - २.
Snow
संस्थेच्या वधू-वर मंडळाचे मुख्य आणि सर्व स्वयंसेवक मंडळी.