व्हिजन-३६५ - महाराष्ट्र जंगम भवन
व्हिजन ३६५ - महाराष्ट्र जंगम भवन हि एक अशी संकल्पना आहे जिच्या मार्फत आपण पिंपरी-चिंचवडच्या जंगम समाजासाठी स्वतःची अशी पिंपरी-चिंचवड भागात एक इमारत तयार करू इच्छितो जिथे समाजाचे सर्व बांधव एकत्र येऊ शकतात. आपण वेळोवेळी जे सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबवत असतो ते सर्व कार्यक्रम भविष्यात ह्या जागेत आयोजित करू शकू. तसेच, भविष्यात ह्या वास्तूमध्ये समाजाच्या होतकरू विद्यार्थ्यांसाठी एक वसतिगृह आणि एक ग्रंथालय करण्याचा मानस आहे.
आपल्या समाजासाठी लागणारी हि वास्तू घडविण्याचे निमित्त आणि इतर अनेक बाबींसाठी आपल्याला सक्षम आर्थिक पाठबळाची गरज आहे. आज पर्यंत अनेक दानशूर आणि समाजासाठी कळवळा असणाऱ्या लोकांनी आपापल्या परीने आर्थिक मदत हि देणगी स्वरूपात केलेली आहे. सर्वांनी ह्याकामी लागणाऱ्या आर्थिक नियोजनात सक्रिय हातभार लावला आहे. त्याबाबत संस्था आपल्या सर्वांची शतशः ऋणी आहे आणि कायम राहील.
तथापि, आज पर्यंत जमा झालेली देणगी रक्कम हि आपली वास्तू संपूर्ण करणेबाबत पुरेशी नाही. आम्ही याद्वारे आपल्या सगळ्या इतर अनेक समाज बांधवांना कळकळीचे आवाहन करतो कि आपण सर्वांनी पुढे येऊन आपल्याला शक्य होईल तेवढी, ऐच्छिक रक्कम दान स्वरूपात करावी. मी आणि संपूर्ण जंगम संस्था आपल्या सर्वांचे पाठबळ आणि देणगी हि योग्य आणि विधायक कामासाठीच खर्च होईल ह्याची जबाबदारी घेतो आणि हमी देतो. आपण लवकरच समाजातील ह्या सर्व देणगीदारांची नावे इथे या पटलावर जाहीर करणार आहोत. त्याबाबत काम चालू आहे.
ह्या नियोजित इमारतीचा इतर अनेक गोष्टीबाबत तपशील आपण इथे देणार आहोत. काही ठळक गोष्टी खाली दिल्याप्रमाणे.
- अपेक्षित खर्च आणि ठिकाण
- नियोजित आराखडा आणि सोयी सुविधा
- आर्थिक देणगी देण्याबाबत बँकेचे अकाउंट तपशील
- आजपर्यंत देणगी दिलेल्या सर्व देणगीदारांची सूची आपण इथे पाहू शकता –> देणगीदार सूची.
शेवटी पुन्हा एकदा मी संस्थेच्या आणि माझ्या संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आपल्याला नम्र विनंती करतो आणि आशा करतो कि आपण सर्वजण ह्या कमी आर्थिक हातभार लावाल.
आपला कृपाभिलाषी,
विजय जंगम.
अध्यक्ष - पिंपरी-चिंचवड शहर जंगम समाज संस्था.